राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालयात व संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात घेतली शपथ.

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) दरवर्षी प्रमाणे २५ जानेवारी शनिवार रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज २५ जानेवारी शनिवार रोजी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली.
येथील तहसील कार्यालयात व संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी ना. तहसिलदार चैनसिंग बहुरे, नायब तहसीदार संभाजी देशमुख यांनी उपस्थितांना मतदानाचा अधिकार बजावलाच पाहीजे व तो आपला हक्क आहे. लोकशाही मजबुत करण्यासाठी जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने १८ पुर्ण झाले की मतदान नोंदणी करण्याचे आवाहन देखील ना. त. देशमुख व ना. त. बहुरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, केंद्र प्रमुख फिरोज तडवी, उपस्थित होते. तसेच प्राचार्य शिरीष पवार, महसुल सहायक विजय ऊमाळकर, मंगेश पवार, अनिल पवार, दिपक फुसे, विशाल निकम, संजय नावकर, संतोष नवगिरे व शिक्षकवृंद व विद्यार्थी आदीची उपस्थिती होती.



