आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आज महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

सोयगाव दि. २९ (प्रतिनिधी) सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या दि. १७ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दि. ३० मंगळवारी सकाळी ०८:०० ते ०२:०० यावेळेत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून आरोग्य तपासणी केली जाणार असल्याने परिसरासह तालुक्यातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दि. ३० मंगळवारी सकाळी ०८:०० ते ०२:०० यावेळेत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. मिनाक्षी अंधाळकर (गायनेकोलॉजिस्ट), डॉ. रुपेश माथे (पेडियाट्रिसियन), डॉ. गिरीधर बोंडले (आय स्पेशालिस्ट), डॉ. अमोल कुकडे (फिजिशियन), डॉ. अजिंक्य इंगोले (ऑर्थोपेडिशन), डॉ. मुंडे (डर्माटोलॉजिस्ट), डॉ. जगदीश टेकळे (पायकिआट्रिस्ट), डॉ. नितीन निकाळे (सर्जन), डॉ. मारावार (अनेथेशिया), डॉ. पुष्कर दहिवाल (डेंटल सर्जन) या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. परिसरासह तालुक्यातील महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका.