ताज्या घडामोडी

सोयगाव-शेंदूरणी-हळदा रस्त्याच्या कामासाठी सोयगावला तासभर रस्ता रोको.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासन नंतर माघार..

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) सोयगाव – शेंदूरणी – हळदा रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत आहे. रस्ता गुणवत्ता पूर्वक होत नाही या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता आधीच मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित विभागाचे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे सदर रस्ता गुणवत्ता पूर्ण व्हावा यासाठी बुधवारी अकरा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत सोयगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षीय रस्ता रोको करून निदर्शने करण्यात आली होती. दरम्यान भाजपचे सुनील गव्हांडे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते फर्दापूर रस्त्यावर वाहनांची रांगा च रांगा लागल्या होत्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजय टाकसाळ यांनी सदर काम हे गुणवत्ता पुर्वक करण्यात येईल, तसेच अंदाजपत्रक नुसार काम करून (दि.३१) मार्च पूर्वी हे काम पूर्ण करून काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला दंड देण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईड पट्ट्या मुरुमाने भरण्याची आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रंगनाथ काळे, मंगेश सोहनी, मयूर मनगटे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, रवींद्र काळे, गजानन चौधरी, शिवसेना  तालुकाप्रमुख (उ. बा. ठा. गट) दिलीप मचे राजेंद्र जावळे, संजय मोरे, शोभराज चौधरी, संजय तायडे, गजानन चौधरी, नामा जाधव, वसंत बनकर, प्रमोद पाटील ,भागवत बारी, रघु बारी समाधान आहे अजय नेरपगारे आदी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका.