आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

सोयगावात आनंद मेळाव्यातून झाले व्यवहार ज्ञान, स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची विक्री..

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) सोयगाव येथील अजंता व्हॅली इंग्लिश स्कूल शाळेत शनिवारी विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला औचित्य साधून खरी कमाईचा आनंद महोत्सव भरविला. याद्वारे दर्जेदार खाद्यपदार्थांची विक्री करून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान झाले.
मुख्याध्यापक रुपाली मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील  शिक्षिका यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांनी हा आनंद मेळावा घेण्यात आला. मेळाव्यादरम्यान ४५ स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तू व दर्जेदार खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. या मेळाव्यास अध्यक्ष स्थानी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक पंकज ठोकळ,..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख पाहुणे तिरुपती अर्बन को. ओ. बँक चे  चेरमन गोपाल राजपूत  होते. व्यासपीठावर शाळेचे संचालक भास्कर पिंगlलकर, डॉ. दिनकर पिंगाळकर, डॉ. स्वाती पिंगlळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रूपाली मानकर यांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सीमा भामरे  यांनी केले. शालेय जीवना पासुनच विद्यार्थ्यां मध्ये व्यवसाय मध्ये रुची वाढवावी आणि विद्यार्थ्यां मध्ये व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे ह्या उद्देशाने दर वर्षी शाळे मध्ये आनंद मेळा चे आयोजन करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेवुन फॅक्त नोकरी च्यl मागे न लागता स्वतःची रुची ओळखुन व्यवसायात प्रगती करावी तसेच पालकांनी आपल्या मुलांना पाठिंबा द्यावा असे प्रतिपादन प्रमुख मान्यवरांनी केले. कोणताही व्यवसाय करतांना आत्मविश्र्वास, जिद्द, प्रामाणिक पणा, प्रचंड महेनत आणि चिकाटी खूपच महत्त्वाची आहे. आनंद मेळाव्यात ४५ विद्यार्थांनी विविध रुचकर खाण्याचे पदार्थांचे स्टॉल जसेकी पाणीपुरी, खमण ढोकळा, सँडविच, पुरणपोळी, साबुदाणा वडा, चकली, खाखरा लावले होते. आणि पालेभाज्या, कटलरी समान आणि विविध गेम्स चे पण स्टॉल उपलब्ध होते. आजच्या शाळेत आनंद मेळाव्यात एक लाख २५ हजार ची उलाढाल झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुजा दामोधर, प्रियांका रोकडे, रंजना जाधव, सोनाली बागुल, रूपाली गोल्हारे शिक्षकांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button