आपला जिल्हा

छत्रपती संभाजीनगर दि. २ (वृत्तसेवा) सोयगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या बदलीनंतर सोयगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर शिवाजीराव गोरे यांनी सोमवार (दि. १) रोजी पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवार (दि. २) रोजी सोयगाव पोलीस ठाण्यात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना, सोयगाव तालुका शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे, तालुका सचिव संदीप इंगळे, ईश्वर इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी संदीप सुसर, राजू सोनवणे, गजानन दांडगे, सादिक तडवी, बाम्हणदे, कुणाल जाधव आदी उपस्थित होते. नवनियुक्त प्रभारी अधिकारी दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, तसेच नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून अधिक प्रभावी सेवा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button