आपला जिल्हा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवी कार्यकारिणी; अध्यक्षपदी ॲड. संतोष झाल्टे.

अंधश्रद्धेविरोधी जनजागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारासाठी नवी कार्यकारिणी सज्ज.

छत्रपती संभाजीनगर दि. ०५ (प्रतिनिधी) येथील इंद्रराज महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सिल्लोड शाखेची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी ॲड. संतोष झाल्टे यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ. प्रकाश बिऱ्हाडे यांची फेरनिवड करण्यात आली.

या बैठकीस जिल्हा प्रधान सचिव प्रा. शिवाजी वाठोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि समाजातील अंधश्रद्धांविरुद्ध जनजागृतीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी उर्वरित कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. व्यंकटेश लांब व जगदीश बेदवे यांची निवड करण्यात आली. प्रधान सचिवपदी एन. आर. फाळके, सचिन दांडगे व सीताराम काळे यांची जबाबदारी देण्यात आली असून बुवाबाजी विरोधी संघर्षासाठी विशेष पथक कार्यरत राहणार आहे.

कार्यवाहपदी हरिदास वाघ, सहकार्यवाहपदी मुसाखान पठाण यांची निवड झाली. विविध उपक्रम कार्यवाह म्हणून प्रा. डॉ. अनिरुद्ध मोरे तर सहकार्यवाह म्हणून अनिल साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. वैज्ञानिक जाणिवा प्रसारासाठी कार्यवाह म्हणून प्रा. डॉ. जगदीश सावदेकर तर सहकार्यवाह म्हणून डॉ. सचिन साबळे व डॉ. दत्तात्रेय भवर यांची निवड करण्यात आली.

महिला कार्यवाह म्हणून प्राचार्य अर्चना अहिरे तर सहकार्यवाह म्हणून सरला कामे यांची निवड झाली. युवा कार्यवाह म्हणून गजानन इंगळे तर सहकार्यवाह म्हणून नितीन निकम यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम कार्यवाह म्हणून रुपेश ठाकूर तर सहकार्यवाह म्हणून किसनराव शिंदे यांची निवड करण्यात आली.

बैठकीचे सूत्रसंचालन एन. आर. फाळके यांनी केले. प्रा. डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी आभार मानले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून आगामी काळात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अधिक व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Back to top button