सोनसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. सोनसवाडी ता. सोयगाव संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

सोयगाव दि. २७ (वृत्तसेवा) सोनसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सोनसवाडी ता.सोयगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ शुक्रवारी अगस्तीमुनी महाराज वारकरी शिक्षण संस्था आमखेडा येथे सोसायटीचे चेरमण चंद्रास (आप्पा) लोटू रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी नऊ वाजता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे ॲड. राजेश गिरी हे उपस्थित होते. दरम्यान सकाळी नऊ वाजता अगस्तमुनी महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या सभागृहात माता लक्ष्मी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. राजेश गिरी, पत्रकार दिलीप शिंदे यांच्यासह सभासदांचा सत्कार करण्यात आला. नंतर अध्यक्षांच्या परवानगीने संस्थेचे सचिव दिलीप रावणे यांनी मागील सभेचा इति वृत्तांत वाचन करून विषय पत्रिकेप्रमाणे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन काशिनाथ बडक, संचालक ज्ञानेश्वर गाडेकर, पुंडलिक सोहनी, अक्षय काळे, नारायण घनगाव, दत्तू पाटील, अर्जुन ढगे, रघुनाथ फुसे, सुकलाल मोरे, ताराबाई इंगळे, शोभाबाई चौधरी, सीताबाई पगारे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक नारायण घनगांव यांनी उपस्थितांचे आभार मानुण सभा संपल्याचे जाहीर केले.



