आपला जिल्हामहाराष्ट्र

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ड्रेनेज बांधकाम करून विटंबना थांबवा.- भाजपाची मागणी…

भाजपा तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा.

सोयगाव दि. २७ (वृत्तसेवा) शहरातील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सोयागाव नगर पंचायत ने विकासाच्या नावावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ड्रेनेज खोदून ठेवली आहे. त्यामुळे गावातील सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. ही महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एक प्रकारे विटंबना होत आहे. हा प्रकार नगर पंचायतीने तात्काळ थांबवून येत्या सात दिवसांत ड्रेनेजचे बांधकाम करावे नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा शहर शाखेतर्फे दि. २७ शुक्रवार रोजी देण्यात आला आहे.
सोयगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुना बाजार (डॉ. आंबेडकर) चौकात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्यासमोर गावातील दुर्गंधी घेऊन वाहणारी ड्रेनेज आहे. या ड्रेनचे नगर पंचायतीने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण पसरले आहे. पावसाल्यात हे पाणी थेट महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला वळसा घालून वाहते. त्यामुळे बाबसाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना होत आहे.
सोयगाव नगर पंचायत विकासाच्या नवाववर याकडे हेतूपुरकर दुर्लक्ष करीत असून मागास वस्तीत अस्वसच्छता पसरवीत असल्याने येथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. येथे सात दिवसांच्या आत ड्रेनेज बांधकाम करण्यात येऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात न आल्यास भाजपा तर्फे जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा नगर पंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे.
या निवेदनावर शहर अध्यक्ष योगेश पाटील, तालुका चिटणीस वसंत बनकर, मंगेश सोहनी, सुनिल गावंडे, अस्लम पिंजारी व युवा अध्यक्ष मयूर मनगटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button