क्राईम

एक महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा तपास लागता लागेना, त्यातच घोसला गावात पुन्हा जबरी चोरी… परिसरात भितीचे वातावरण.

सोयगाव तालुक्यात जबरी चोरी- घोसला गावतील घटना - १ लक्ष ३१ हजार रु. चा मुद्देमाल लंपास...

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) गावालगतच्या शेती शिवारातील पत्र्याची शेड चे कुलूप तोडून चार ठिकाणी डल्ला मारून लोखंडी साहित्यासह एक लक्ष ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घोसला शेती शिवारात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी रविवारी सायंकाळी पाच वाजता अज्ञात तीन ते चार चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    घोसला गावालगत बनोटी रस्त्यावर अनिल भिका बोरसे गट क्र. ६८ सुभाष हरने गट क्र. २२४ ज्ञानेश्वर गवळी गट क्र. २२१ यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच एकाच रात्री कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ३१ हजार रुपयाचे शेती उपयुक्त साहित्य चोरी करून पोबारा केला आहे. दरम्यान रविवारी सकाळी सात वाजता सदर शेतकरी शेतात गेले असता हा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी उपनिरीक्षक रजाक शेख यांनी घटनास्थळी येऊन दुपारी दोन वाजता पंचनामा केला आहे. अनिल भिका बोरसे यांच्या शेड मधून दहा क्विंटल लोखंड खताचा पिशव्या ठिबक चे बंडल दोन विज पपं आणि फवारणी पपं असा ९१ हजार ९४५ रुपये चा मुद्देमालासह सुभाष हरणे यांच्या शेतातील २५ हजार दोनशे रु. चा मुद्देमाल तर ज्ञानेश्वर गवळी यांच्या शेतातून पिटर मशीन, वीज पपं यासह १४ हजार पाचशे रु. किंमतीचा मुद्देमाल असा तिन्ही ठिकाणावरून एकूण एक लाख ३१ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले आहे. याप्रकरणी शेतकरी अनिल भिका बोरसे यांचेसह तिघांनी दिलेल्या संयुक्त फिर्यादी वरून अज्ञात तिन ते चार चोरट्या विरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रजाक शेख जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, संदीप सुसर, अजय कोळी आदी तपास करत आहे.

मागील महिन्यात घोसला गावात माजी सभापती चंद्रकांत पाटील याच्या घरातील कुटुंबातील सदस्य घरी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यानी तब्बल ४५ हजार रुपये रोख व सोन्याची दागिने चोरून लंपास केले होते. सतत च्या चोरीच्या घटनेमुळे घोसला वासीयांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांचा तपास मात्र याबाबत शुन्य आहे. त्यामुळे सोयगाव हद्दीत चोऱ्या चे सत्र वाढते झाले आहे. सोयगाव पोलिसांनी लक्ष घालणं गरजेचे आहे असे ग्रामस्थ कडुन सांगण्यात येत आहे.

सोयगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पोलीसच्या प्रशासनाच्या अर्थपुर्ण हितसंबंधामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढ होत असुन त्यामुळेच तालुक्यात मोठ मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असल्याची चर्चा तालुक्यात ठिक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. याकडे नवनिर्वाचित ग्रामीण पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड हे लक्ष देण्यात कितपत यशस्वी होतात हे पहाणे मात्र औस्तुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button