तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामचुकार व मनमानी कारभाराला कंटाळून तरुण शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न.
सोयगाव तहसील कार्यालयातील प्रकार, वेळीच पोलिस धाऊन आल्याने अनर्थ टाळला.

सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा) वर्षाभरापासुन सोयगाव तहसील कार्यालयात वाटणीचा फेर घेण्यासाठी चकरा मारून मारून वैतागल्या मुळे तालुक्यातील गोंदेगाव तरुण शेतकरी विशाल बिंदवाल यांनी चक्क तहसीलदार यांच्या समोरच आत्मदहण करण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी वेळीच मध्यस्ती केल्याने मोठा अनर्थ टळला मात्र तात्काळ दखल न घेतल्यास उग्र स्वरुपात आंदोलन करणार असल्याचा इशारा तरुण शेतकरी विशाल बिंदवाल यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला आहे.
या बाबत सविस्तर वृत असे कि, सोयगाव तहसील कार्यालयामध्ये वर्षभरापासून वाटणीचा फेर होत नसल्याने तरुण शेतकऱ्याने पेट्रोल ने स्वता केला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालयाला दलालांनी वेढले असून दलालांच्या मध्यास्थिविना सर्व सामान्य जनतेची कामे खोळंबली आहे. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक विभागात थेट खालपासून ते वर पर्यंत भ्रष्ट्राचार बोकाळला असून “जो देईल दाम, त्याचेच होईल काम” उक्तीप्रमाणे कर्मचारी अधिकारी कामे करण्यास टाळा टाळकरीत आहेत. सर्वसामान्य जनतेची प्रकरणे धूळखात पडून असून कामे होत नसल्याने सर्व सामान्य जनतेत तीव्र रोष होत आहे. गोंदेगाव येथील माजी सैनिक सुदाम फुलचंद बिंदवाल यांच्या आजारी पत्नीच्या नावे गोंदेगाव शिवारात गट क्रमांक १७१ मधे ६७ गुंठे जमीन आहे. त्यांना दोन मुले असून हक्क सोड आधारे ही जमीन करण्यासाठी शासन दरबारी खेट्या सुरू आहेत.
वाटणीचा फेर घेण्यासाठी दि. १९ ऑगस्ट २०२४ प्रथम कायदेशीर नोटरी द्वारे हक्क सोड कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यानंतर तहसीलदार यांनी संगितल्यावरून रजिस्टर हक्क सोड दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले व तहसीलदार यांच्या कडे सादर करण्यात आले. तहसीलदार सोयगाव यांनी दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी गोंदेगाव तलाठी यांना पंचनामा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हा पंचनामा अहवाल दि. २४ जानेवारी २०२५ रोजी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. दरम्यान माजी सैनिकाच्या पत्नीने तहसील कार्यालयात ८ ते १० वेळा खेट्या घातल्या आहेत. मात्र अधिकारी कर्मचारी उडवा उडविची उत्तरे. देऊन हाकलून लावत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या माजी सैनिकाचा मुलगा विशाल सुदाम बिंदवांल यांनी हक्क सोड आधारे शेतीची वाटणी होऊन फेर करण्याच्या मागणीसाठी दि. २२ एप्रिल २०२५ रोजी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून दि. १३ मे २०२५ आत्मदहनाचा ईशारा दिला होता.
दिलेल्या आत्मदहन इशाऱ्या नुसार मंगळवारी दुपारी २.३५ वाजता विशाल सुदाम बिंदवाल याने पोलिसांना गुंगारा देऊन तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनात प्रवेश मिळवत सोबत आणलेल्या पेट्रोलच्या बाटल्या आंगावर ओतून घेत आत्दहनाचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आरडा – ओरड झाल्याने पोलिस घटनास्थळी धाऊन आल्याने मोठा अनर्थ टाळला. यावेळी तहसीलदार मनीषा मेने या देखील मुख्य दालनात उपस्थीत होत्या तात्काळ फाईल मागवत कागदपत्र तपासणी करीत ३० मे पर्यंत प्रकरणाचा निकाल दिल्या जाईल अशी असे आश्वासन दिल्याने व नायब तहसीलदार संभाजी देशमुख तसेच पोलिसांनी वेळीच मध्यस्ती केल्याने मी आत्मदहण तात्पुरते स्थगित करीत असून जर मला ३० मे पर्यंत न्याय न मिळाल्यास परत तीन जून ला आत्मदहन करणार असल्याचे तरुण शेतकरी विशाल बिंदवाल यांनी दै. महाभारत च्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले. यावेळी पो. कॉ. रविंद्र तायडे, गजानन दांडगे, संजय सिंगल, होमकार्ड विशाल वराडे, राहुल जाधव, लोकेश जाधव यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.


