तीन वर्षाच्या मुलासह वडिलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू..
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा शिवारातील घटना.

सोयगाव दि. ०८ (प्रतिनिधी ) सोयगाव तालुक्यातील पळसखेडा शिवातील गट नं. २३० मध्ये शेततळ्यात बुडून परप्रांतीय ३५ वर्षिय शेत मजुर व त्याच्या ०३ वर्षिय मुला चा बुडून मुर्त्यू झाल्याची घटना रविवार रोजी संध्याकाळ च्या सुमारास घडली आहे.
पळसखेडा येथिल शेतकरी मनोज रामसिंग शेवगन यांचे पळखेडा शिवारात गट. नं. २३० मध्ये शेत आहे. या शेतात काम करण्यासाठी एक वर्षा पासून मध्यप्रदेशातील दुलकोट जि. बुरहाणपूर येथिल विनोद रमेश डुडवे यांना शेतात काम करण्यासाठी शेत मजुर म्हणून ठेवले होते. विनोद डुडवे हे गेले एक वर्षा पासुन त्यांच्या शेतातच परीवारासह राहत होते. आज रविवार रोजी संध्याकाळच्या सुमारास शेतात असलेल्या शेत तळ्यात विनोद रमेश डुडवे (वय ३५) व त्याचा मुलगा मनोज रमेश डुडवे (वय ०३) दोघे हि रा. दुलकोट ता. नेपानगर जि. बर्हापुर मध्यप्रदेश ह्या दोघांचा शेतळ्यात बुडून मुर्त्यू झाला आहे. हि घटना कशी घडली याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांना शेततळ्यातुन मृत आवस्थेत नागरिकांनी बाहेर काढून सोयगाव येथील ग्रामीण रूग्नालयात दाखल केले आहे. या घटने ची माहिती फर्दापूर पोलिसांना देण्यात आली आहे.
मात्र अद्याप कुठलाच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बापलेकांचा शेत तळ्यात बुडून मुर्त्यू झाल्याने परीसरात हळहळ वेक्त करण्यात येत आहे.



