शिवसंकल्प मेळावा निम्मिताने आज सिल्लोड शहरात युवासेना प्रमुख शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांचा दौरा.
शिवसंकल्प मेळावा निम्मिताने सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे विठ्ठल बदर पाटील यांचे आवाहन.

सोयगाव दि. २४ (वृत्तसेवा) शिवसंकल्प मेळावा निम्मिताने युवासेना प्रमुख शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा दोन दिवसीय दौरा असून या दरम्यान दि. २५ रविवारी दु. ०२:०० वाजता सिल्लोड येथे प्रियदर्शनी चौक सिल्लोड शहर येथे उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सोबत शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, मराठवाडा सचिव अशोकजी पटवर्धन, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, आ. उदयसिंग राजपूत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख, तालुका संघटक, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, किसान सेना शिक्षक सेना सर्व पदाधिकारी, व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी, दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथ प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सर्व शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आपणास यांच्या सह शिवसैनिकांनी आज दि. २५ रविवार दुपारी २:०० वाजता शिवसंकल्प मेळाव्यासाठी प्रियदर्शनी चौक सिल्लोड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर पाटील यांनी केले आहे.

युवासेना प्रमुख शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा. दि. २५ रविवार विधानसभा क्षेत्र सिल्लोड – सोयगाव दु. ०२:०० वाजता. दि. २५ रविवार विधानसभा क्षेत्र छत्रपती संभाजीनगर पश्चिम सायं. ०६:०० वाजता. दि. २६ सोमवार विधानसभा क्षेत्र पैठण स. १०:०० वाजता. दि. २६ सोमवार विधानसभा क्षेत्र गंगापूर – रत्नपूर दु. १२:१५ वाजता. दि. २६ सोमवार विधानसभा क्षेत्र वैजापूर दु. ०२:०० वाजता. दि. २६ सोमवार विधानसभा क्षेत्र पैठण स. १०:०० वाजता. दि. २६ सोमवार विधानसभा क्षेत्र कन्नड – सोयगाव सायं. ०४:३० वाजता.


