आपला जिल्हामहाराष्ट्र

नामदारांच्या शिक्षणसंस्थेतील कर्मचाऱ्याकडून तहसिल कार्यालयातच निवडणूक अधिकाऱ्याच्या डीएससी चा वापर, तहसील ची सुरक्षा रामभरोसे….

शिक्षण संस्थेचा लिपिक बनला तहसीलचा पेशकार....

सोयगाव दि. २८ (वृत्तसेवा) पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव येथील नॅशनल मराठी हायस्कुलचा लिपीक ने तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाचा ताबा घेऊन डीएससी चा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार दि. २८ बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांची दुबार नावे असल्याची तक्रार भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याने सत्तारांनी सोयगावकडे मोर्चा वळविल्याची चर्चा शहरात रंगली आहे. संस्थेतील कर्मचाऱ्याने निवडणूक विभागाच्या डीएससी चा वापर केल्या प्रकरणी तहसीलदार मनीषा मेने काय कार्यवाही करतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ना.अब्दुल सत्तार यांना येणारी निवडणूक जड जाणार असल्याने ऍक्शन मोडवर आले आहे. ना. अब्दुल सत्तारांच्या सोयगाव येथील नॅशनल मराठी शाळेत लिपीक पदावर नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्याने चक्क सोयगाव तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागातील पेशकाराच्या खुर्चीचा ताबा घेतला होता. पेशकाराच्या खुर्चीत बसून निवडणूक विभागाच्या डीएससी चा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिपीकाने डीएससी चा वापर कशासाठी केला त्याला लॉगिंग करून देण्यास कुणी मदत केली. तो खुर्चीवर बसून बिनधास्त डीएससी चा वापर करीत असताना कार्यालयात उपस्थित तहसिल कर्मचाऱ्यांनी त्यास विचारणा का केली नाही, त्याने मतदान यादीतील काहींची नावे डिलीट तर केली नसावी किंवा बोगस मतदान नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असावा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तहसिल कार्यालयातील दस्तावेज च्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ना. अब्दुल सत्तारांवर अनेकांनी बळजबरीने जमिनी बळकावल्याचा आरोप केला आहे. ना. सत्तारांच्या शिक्षण संस्थेत लिपीक पदावर असलेल्या ने असे कृत्य करणे यामागे कुणाचा हात आहे. तहसील कार्यालयातील कोणत्या कर्मचाऱ्याने त्यास सहकार्य केले याची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तहसीलदार मनीषा मेने काय कार्यवाही करतात की पालकमंत्री यांच्या दबावाला बळी पडतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जणू शासकीय कार्यालयांमध्ये रझाकारी सुरू झाल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे.

Related Articles

Back to top button