आपला जिल्हा

राज्य केळी उत्पादक शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी धिरज पाटील.

सोयगाव दि. १२ (वृत्तसेवा) शिंदोळ ता. सोयगाव येथील प्रगतिशील युवा शेतकरी धिरज पाटील यांची राज्य केळी उत्पादक शेतकरी संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

धिरज पाटील यांनी शेती उद्योग हे आव्हान स्विकारून केळी क्षेत्रात संकट प्रतिकूल परिस्थितीत सामना करीत जिद्द, परिश्रम उमेद न हारता शेती उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहून भरघोस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी धिरज पाटील यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण व राज्य उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव यांनी निवड पत्राद्वारे नियुत्ती केली. सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या शिंदोळ येथील युवा शेतकरी धिरज पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती निवड झाल्या बद्दल सामाजिक, राजकीय व शेतकरी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाटील याचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button