वाढदिवस कुटुंब समवेत गो मातेची सेवा करीत अनोख्या पद्धतीने केला साजरा…

सोयगाव दि. ११ (प्रतिनिधी संदीप इंगळे) साधारणपणे लग्नाचा वाढदिवस किंवा वाढदिवसाची पार्टी म्हणजे लोक केक कापतात आणि मित्र आणि नातेवाईकांना मोठी पार्टी देऊन साजरी करतात. मात्र, सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील अंजनाई गोशाळेत एका तरुणाने वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
आमखेडा येथील रहिवाशी असलेल्या संजय रघुनाथ वाडेकर यांचा मुलगा डॉ. अजय वाडेकर यांनी आमखेडा येथील अंजनाई गोशाळेत दि. १० बुधवारी त्यांचा वाढदिवस – शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा केल्याने त्यांचे तालुकाभरातून कौतुक केले जात आहे.
वाढदिवस आणि वर्धापन दिनाच्या नावाखाली लोक लाखो रुपये खर्च करतात. आमखेडा येथील डॉ. अजय वाडेकर यांनी दाखवून दिले आहे की हाच पैसा यासारख्या उदात्त कार्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. गोशाळेच्या देखभालीसाठी लाखो रुपयांची गरज आहे. पार्ट्यांवर अवाजवी खर्च करण्याऐवजी मोकाट जनावरांसोबतही आनंदोत्सव साजरा करता येतो हे डॉ. अजय वाडेकर यांनी दाखवून दिले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी विना कारण पैशांची उधळपट्टी नको या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून अंजनाई गो-शाळेतील ७० गो – मातांसाठी ढेप (एक पोते) घेऊन देत सहकुटुंब गो – शाळेवर अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी क्रांती जनहित बहुउद्देशिय विकास संस्था संचलित अंजनाई गो-शाळेच्या वतीने संचालक अशोक ढगे यांच्याहस्ते डॉ. अजय वाडेकर यांच्यासह संजय वाडेकर, सौ. सायली अजय वाडेकर, संजय वाडेकर, कु. निकिता वाडेकर, दत्तात्रय सोहनी, आशिष मालोदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, सचिव दिलीप शिंदे, विश्वनाथ कोथलकर, अनिल लोखंडे, ज्ञानेश्वर गाडेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.


