क्राईम

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींला शोधण्यात सिल्लोड पोलिसांना अपयश.

पोलिसांवर राजकीय दबाव मृताच्या बहिणीचा आरोप.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव येथील खून प्रकरणातील आरोपी ४२ दिवस उलटले तरी सापडता सापडेना…

छत्रपती संभाजीनगर दि. ०६ (वृत्तसेवा) सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील विशाल एकनाथ उगले या तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी वैभव नामदेव तायडे वय ३२ वर्ष रा. अंधारी या फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना तब्बल ४२ दिवस उलटून देखील यश मिळत नसल्याने हत्या झालेल्या तरुणाच्या बहिणीने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना भेटून विशाल उगले यांची बहीण सरिता विनोद निकम यांनी पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले. आहे दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी माझा भाऊ विशाल याचा खून झाला होता. या घटनेला ४२ दिवस उलटले असून सुद्धा तरी देखील या गुन्ह्यातील आरोपी वैभव हा अजूनही फरार आहे. या घटनेपूर्वी वैभव याने त्याचा रिवाल्वर चा एक फोटो विशालच्या व्हाट्सअप वर पाठवला होता. तुझा आम्ही गेम करू. असा मेसेज त्यासोबत होता. त्यानंतर विशालचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात वैभव याचा मोठा सहभाग आहे. वैभव याचे मोठ्या राजकीय व्यक्तीसोबत संबंध असल्याने राजकीय दबाव असल्याने पोलीस त्याला अटक करीत नाही. असा आरोप करीत फरार आरोपी याला तात्काळ अटक करण्याची मागणी विशाल ची बहिण सरिता निकम यांनी केला आहे.

“पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही सदर फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. लवकरच फरार आरोपीला आम्ही अटक करू…” विजयसिंग राजपूत पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाणे सिल्लोड.

मयत विशाल याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. त्यावरून मुलीच्या मामांनी व इतर आरोपींनी विशालचा चाकूने वार करून २४ फेब्रुवारी रोजी हत्या (खून) केली होती. पोलिसांनी या घटनेतील १७ इसमांवर खुनाचे गुन्हे दाखल केलेले आहेत पैकी १५ आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला आहे तर एका आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या विशेष पथकाला एका आरोपीला शोधण्यासाठी अजून किती दिवस लागणार हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button