ताज्या घडामोडी

सोयगाव नगरपंचायतच्या मनमानी कारभारा विरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक…

नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडले बंद..

सोयगाव दि. ०६ (वृत्तसेवा) शहरातील दलित वस्ती योजने अंतर्गत सोयगाव नगरपंचायतने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात नाली चे काम सुरु केले आहे. परंतु नालीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी जाब विचारातच नगर पंचायत विभाग निरुत्तर झाल्याने योग्य पद्धतीने शासन निर्णयाप्रमाणे करीत नाही तो पर्यंत सदर काम बंद करण्यात यावे असे लेखी निवेदन देत चक्क काम बंद पाडले आहे. सोयगाव शहरात नगरपंचायत च्या वतीने विविध वार्डांमध्ये विकासात्मक कामे चालू आहे. परंतु एकाही कामावर शासकीय आदेशानुसार फलक लावण्यात येत नाही. तसेच कुठल्या निधीमधून काम केल्या जात आहे? ठेकेदाराचे नाव काय? कामाचा कालावधी किती? योजनेचे नाव काय? अशी माहिती देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. तसेच नागरिकांनी कामाचे अंदाज पत्रकाची मागणी केल्यास नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी हे माहिती देण्यास टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराला गेल्या पाच वर्षापासून विकास कामापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात येत होते. शासनाकडून दरवर्षी दलित वस्तीतील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात येतो. परंतु करण्यात आला निधी नेमका जातो कुठे हे मात्र निरुत्तर आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश पगारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विकास कामे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर नगरपंचायतला जाग आली होती त्यामुळे परिसरातील कामे सुरु करण्यात आली परंतु सदर कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे असल्यामुळे व सदरील कामाबाबत माहिती फलक लावण्यात आलेला नसून कामाचे अंदाज पत्रकांची प्रत मांगीतली असतात अंदाजपत्रक उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे सदर काम शासन निर्णयाप्रमाणे होण्या करिता बंद करण्यात आले असल्याचे अंकुश पगारे यांनी सांगितले.

आत्मदहनाचा इशारा…

नगरपंचायतने प्रत्येक वार्डातील विकास कामावर शासकीय नियमानुसार फलक न लावल्यास, व दलित वस्तीतील कामे शासन निर्णय (अंदाजप्रत्राकाप्रमाणे) करण्यात न केल्यास तसेच सदर कामाचे अंदाज पत्रक तात्काळ उपलब्ध न करून दिल्यास तसेच निकृष्ट दर्जाचे कामे चौकशी करून कारवाई करण्यत यावी नसता नगरपंचायत समोर आत्मदहन करणार असल्याचे. अंकुश पगारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच निवेदनावर सुमित वानखेडे, रवींद्र गंगावणे, आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Back to top button