क्राईम

माळेगाव पिंपरी चौफुलीवर चोरट्या मार्गाने विना परवाना वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडला..

जरंडी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.

सोयगाव दि. २३ (वृत्तसेवा) पाचोरा वरून सोयगावकडे विना परवाना चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा क्र. – एम. एच. – १४ एच. जि. – २७७७ जरंडी जवळील माळेगाव चौफुलीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सापळा रचून रंगेहाथ पकडल्या ची घटना मंगळवारी (दि. २३) पहाटे चार वाजता केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये हायवासह १२ लक्ष ३५ हजार रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात गुर न. ११/२४ कलम ३७९ आय. पी. सी. २१ (१) गौण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चालक भिकन जुम्मा पिंजारी (वय ३३) यास अटक करण्यात आली आहे. या कारवाई मुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ची धाबे दणाणले आहे.

     पाचोरा तालुक्यातून सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने विना परवाना वाळूची तस्करी सुरू असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. दरम्यान मंगळवारी पहाटेच चार वाजता पाचोरा जरंडी रस्त्यावर माळेगाव पिंपरी चौफुलीवर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ व इतर अंधारात सापळा रचून होते. दरम्यान पाचोरा कडून आलेले हायवा वाहन क्र. – एम. एच. – १४ एच. जि. – २७७७ रंगेहाथ पकडून चालक भिकन जुम्मा पिंजारी (वय ३३) रा. तारखेडा ता. पाचोरा जि. जळगाव यास अटक करून त्याच्याकडून सात ब्रास वाळू किंमत ३५ हजार रु. व हायवा किंमत १२ लक्ष रु. असा एकूण १२ लक्ष ३५ हजार रु. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाई मुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षक मनीष कालवानीया, अप्पर अधिक्षक सुनिल लांजेवार, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम सिरसाठ, नवनाथ कोल्हे, गणेश सोनवणे, सोयगाव चे सपोनी अनमोल केदार, जमादार राजू बर्डे, संदीप सुसर आदी पुढील तपास करत आहे..

Related Articles

Back to top button