क्राईम

सोयगाव तालुक्यातील चौघे एक वर्षासाठी दोन जिल्ह्यातून हद्दपार;

सोयगाव पोलिसांची कारवाई-तालुक्यात खळबळ

सोयगाव दि. १४ (प्रतिनिधी संदीप इंगळे) सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा या एकाच गावातील चौघांवर पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केल्याची कारवाई सोयगाव पोलिसांनी रविवारी केली आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. हे चारही एकाच कुटुंबातील असून अवैध दारू विक्रीच्या व्यवसायावर झालेल्या कारवाई च्या रागातून त्या चौघांनी दारुबंदी विभागाचे छत्रपती संभाजीनगर चे विशेष पथक दि. १९ जुलै २०२३ मध्ये नांदगाव तांड्यात कारवाई करत असतांना हॉटेलवर झालेल्या कारवाई नंतर  सदर आरोपीचे राहते घरी नांदगाव तांड्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री करण्यासाठी आणलेला साठा असल्याची अधिकची माहीती मिळाल्यावरुन विशेष पथक खात्री करण्यासाठी आरोपीचे घरी पाहचले असता अवैध दारुचे मोठ्या साठ्यावर कारवाई होवु नये म्हणुन बद्रीनाथ महारु राठोड, किरण बद्री राठोड, संदिप बद्री राठोड, राहुल उर्फ जादु भाईदास राठोड सर्व रा. नांदगाव तांडा ता. सोयगाव यांनी संगनमत करुन सदर पथकावर हल्ला केला. त्यात पथकातील दारुबंदी विभागाचे अधिकारी, अंमलदार जखमी झाले त्यानंतर सदर आरोपींनी पेट्रोल काढुन सरकारी वाहणावर टाकुन पेटवुन दिले त्यावरुन पोलीस ठाणे सोयगाव येथे गुरनं १४९/२०२३ कलम ३५३, ३३२, ३५२, ३२३, ५०४, ५०६ (२) ३४ भा. दं. वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपीनी यापुर्वी देखील संनगमत करुन गुन्हे केले. त्यावरुन सर्व आरोपींची माहीती घेवुन पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचेकडे कलम ५५ (१) महा. पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव सादर केला असता  पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी आरोपी नामे १)  बद्रीनाथ महारु राठोड, २) किरण बद्री राठोड, ३) संदिप बद्री राठोड, ४) राहुल उर्फ जादु भाईदास राठोड सर्व रा. नांदगाव तांडा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर यांना छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्ह्यातुन एक वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनमोल केदार, राजू बरडे, रविंद्र तायडे, अजय कोळी, दांडगे यांचे पथकाने केले असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनमोल केदार साहेब हे करीत आहे.

Related Articles

Back to top button