ना. अब्दुल सत्तारांचा अभिष्टचिंतन सोहळ्यात दिलेले धनादेशची रक्कम तब्बल आठ दिवसांनी दिव्यांगांच्या खात्यात जमा.
महाराष्ट्र लाईव्ह न्यूज च्या दणक्याने नगरपंचायत पंचायत आली जाग.

ना. अब्दुल सत्तारांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात, दिव्यांग मात्र पाच टक्के निधीच्या प्रतीक्षेत... https://mhlive.co.in/?p=2824
सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) नगर पंचायत मार्फत दिव्यांगाना दिव्यांग पाच टक्के निधी वाटप चा कार्यक्रम नगर पंचायत कार्यालयात न घेता मुख्याधिकारी बबन तडवी यांनी राजकीय दबावाखाली शिंदे गटाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून दि. ०२ मंगळवार रोजी दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधीचे धनादेश वाटप करतांना फोटो सेक्शन केले होते. त्या निधीची दिव्यांग बांधव आतुरतेने वाट पाहत होते. परंतु नगर पंचायत ने कोणतेही दखल घेतली नसल्या कारणाने दिव्यांगाची नाराजी विषयी चर्चा परिसरात चांगलीच रंगली होती त्यां संदर्भात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज ने दि. ०७ जानेवारी रविवार रोजी “ना. अब्दुल सत्तारांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात’, ‘दिव्यांग मात्र पाच टक्के निधीच्या प्रतीक्षेत’, ‘नामदारांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात दिव्यांगांची दिशाभूल.” अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यामुळे नगर पंचायत ला जाग आली व दि. १० जानेवारी रोजी ७३ दिव्यांगाच्या खात्यात प्रत्येकी १०९५ रुपये जमा करण्यात आले. जर नगर पंचायतला दिव्यांगांचा पाच टक्के निधी खात्यातच जमा करायचा होता तर त्यांनी उगाच दिव्यांगांना परेशान केले अशी चर्चा दिव्यांगांमध्ये रंगत आहे. मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दि. ०२ कार्यक्रमाला गर्दी जमावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जाणीवपूर्वक दिव्यांगांची हेळसांड केली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
ना. अब्दुल सत्तारांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात, दिव्यांग मात्र पाच टक्के निधीच्या प्रतीक्षेत... https://mhlive.co.in/?p=2824



