सोयगाव येथे भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन, ४० संघाचा सहभाग.

सोयगाव दि. १५ (वृत्तसेवा) सोयगाव येथे आयोजित भव्य ६० किलो वजनी कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे होते. नगरसेवक संदीप सुरडकर मित्र मंडळ तसेच तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोयगाव व परिसरातील एकूण ४० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
सोयगावला सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला आहे असे स्पष्ट करीत हा वारसा जपला पाहिजे यासाठी युवकांनी विविध क्रीडा स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे जेणेकरून क्रीडा स्पर्धेतून शरीर सदृढ व निरोगी राहते असे प्रतिपादन ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, अजीजसेट बागवान, सतिष ताठे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती पा. वराडे, माजी जि. प. सदस्य गोपीचंद जाधव, नितीन बोरसे, एपीआय अमोल केदार, पीएसआय श्री. झलवार, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, न. प. तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नगरसेवक कदिर शहा, भगवान वरांगणे, राजू दुतोंडे, रउफ शेख, भगवान जोहरे, लतीफ शहा, गजानन कुडके, बंटी काळे, अशोक बेडकर, किशोर मापारी, विष्णू इंगळे, मंगेश सोहनी, यांच्यासह योगेश बोखारे, संदीप सोहनी, राम सोहनी, महेश मानकर, महेश दुसाने आदींसह खेळाडू, नागरिकांची उपस्थिती होती.



