सोयगाव तालुक्यात मराठा समाजाच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारे निवेदन.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) मराठा क्रांती मोर्चा, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यातील मराठा समाजाने विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन दिले.
पहिल्या निवेदनात हैद्राबाद गॅझेट नुसार मराठा समाजाच्या ओबीसी प्रमाणपत्राबाबत तातडीने तोडगा काढून प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तहसील कार्यालयाच्या वतीने संबंधित विभागाशी समन्वय साधून लवकरात लवकर प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, त्याकरिता कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कार्यालयामध्ये स्वातंत्र्य टेबल आरक्षित करावा. जेणेकरून कुणबी प्रमाणपत्र काढताना लाभार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
तसेच दुसऱ्या निवेदनात लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला उद्देशून तुम्ही जर ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट झाला तर तुमच्या मुलींचे विवाह आमच्या मुलांना सोबत केला पाहिजे असे एका कार्यक्रमात गलिच्छ विधान केले. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून या भावना समाजातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे. तरी या घटनेत मराठा समाजातील भावना दुखावल्या गेल्याने समाजाने तीव्र आक्रोश व्यक्त केला असून, लवकरच ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रसंगी सोयगाव मराठा तालुका विजय काळे, ॲड. योगेश पाटील, संघपाल सोनवणे, राजेंद्र बडक, बंटी भाऊ काळे, नितीन पाटील, कृष्णा पाटील, संदीप इंगळे, अनिल लोखंडे, संदीप चौधरी, विजय गव्हाड, नितीन फरकाडे, भागवत थोटे, ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे व गणेश पाटील, तसेच मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.



