सोयगाव दि. २० (वृत्तसेवा) तालुक्यातील जरंडी येथील तुळसाबाई गणपत आंबेकर (वय ८५ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. २० ) दुपारी १२ वाजून दहा मिनिटांनी निधन झाले. बुधवारी (दि. २१) सकाळी दहा वाजता त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक नातू, एक नात व नात सून असा परिवार आहे. जरंडी येथील महा ई केंद्र संचालक सचिन आंबेकर यांच्या त्या आजी होत्या.