क्राईम

सोयगाव तालुक्यात दोन ठिकाणी अवैध सावकारी वर छापे, पाच तास कसून चौकशी, जिल्हा निबंधक विभागाचे पथकांची कारवाई.

सोयगाव दि. २० (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील दोघा विरुद्ध अवैध सावकाराच्या प्राप्त झालेल्या तक्रारी वरून जिल्हा निबंधक विभागाच्या दोन विशेष पथकांनी तालुक्यातील निंभोरा आणि गोंदेगाव या दोन ठिकाणी अवैध सावकारांच्या घरात छापे घालून सावकारी संबंधित महत्व पूर्ण कागदपत्रे जप्त केली आहे गुरुवारी दुपारी बारा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल पाच तास ही कारवाई सुरू होती याप्रकरणी दोन्ही पथकांनी कसून चौकशी करून काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त या पथकांच्या हाती आले आहे. या कारवाई मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील निंभोरा व गोंदेगाव या ठिकाणी छापे घालून अवैध सावकारीचा प्रकार उघडकीस आला आहे गोंदेगाव येथील सावकार ग्रस्त सुधाकर महाले यांनी विभागीय सह निबंधक शरद जरे छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या तक्रारी वरून गुरुवारी विभागीय सह निबंधक विभागाचे दोन पथके निंभोरा व गोंदेगावं येथे रवाना झाली होती दुपारी बारा वाजता या दोन्ही पथकांनी रमेश बापू निकम(रा निंभोरा) व संदीप नेरपगारे (रा. गोंदेगाव ) या दोघांच्या घराची सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाडाझडती घेतली असता रमेश निकम यांच्या घरातून पाच ते सहा सावकारी चे दस्त ऐवज जप्त केली तर गोंदेगाव येथून संदीप नेरपगारे यांच्या घरातून कोरे धनादेश पुस्तिका जप्त केल्या ची कारवाई या पथकांनी केली आहे दोन्ही पथकातील आठ कर्मचाऱ्यांनी पाच तास कसून चौकशी केली आहे छत्रपती संभाजीनगर चे विभागीय सह निबंधक शरद जरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे, सहायक निबंधक संजय गाजुलवाड, प्रमोद सावित्र, दिलीप रावणे, के. डी. काकडे, के. सी. शेख, वैशाली एसगे, के. एस. जरारे, एस. आर. घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाई मुळे सोयगाव तालुक्यात अवैध सावकारी करणाऱ्या चे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Back to top button