आपला जिल्हा

एक तास जेवणासाठी अन् दोन तासाचा शुकशुकाट, सोयगावात शासकीय कार्यालयातील वेळापत्रक कोलमडले.

नागरिकांची गैरसोय.

सोयगाव दि. २० (वृत्तसेवा) येथील पंचायत समिती, भूमी अभिलेख व महसूल या शासकीय कार्यालयांत काही रिकाम्या खुर्चा, पंख्यांची हवा खाताहेत. दुपारचे अडीच वाजले तरी जागेवर अधिकारी, कर्मचारी नाहीत. कुठे गेले कर्मचारी? किती वाजता येणार, या प्रश्नाला उत्तर मिळाले “काही सांगू शकत नाही. साहेब जेवायला गेलेत… जेवणासाठी एक तास अन नंतर दोन तासाचा शुकशुकाट असा प्रकार बुधवारी आढळून आला.
बुधवरी दुपारी अडीचनंतरही भूमी अभिलेख, पंचायत समिती व तहसीलमध्ये कुठे अधिकारी नाहीत, तर कुठे कर्मचारी! यापेक्षाही विदारक चित्र म्हणजे तहसीलच्या विविध विभागामध्ये पाहावयास मिळाले. चक्क कर्मचाऱ्यांनी कामानिमित्त आलेल्या नागरिकांना दुपार नंतर जेवण करायला गेल्या नंतर दर्शनच दिले नाही.
तालुक्याच्या पंचायत समिती, भूमी अभिलेख, तहसील या शासकीय कार्यालयात दुपारच्या जेवणाची शासकीय वेळ पाळून कोण काम करतंय? असा प्रश्न निर्माण होत आहे. बाहेर जेवायला गेलाच तर यायला कितीवेळ लागतो? हा विषय घेवून १९ मार्च रोजी शासकीय कार्यालयाची स्थिती जाणून घेतली. काही कार्यालयांत गर्दी दिसली तर काही ठिकाणी रिकाम्या खुर्च्य अधिकारी-कर्मचाऱ्याविना पंख्याची हवा खातानाचे निदर्शनास आले. तर पंचायत समिती विभागातवेळ टळून गेली तरी त्यांचा येण्याचा पत्ता नव्हता. कार्यालयात जेवण करून बरेच कर्मचारी चहा, कॅन्टीन आदी ठिकाणी गेले होते. काही कार्यालयांमध्ये दुपारी तीननंतरही कर्मचारी खुर्चीवर दिसत नव्हते.त्यामुळे
शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना वेळा पाळण्याची अंमलबजावणी करायची कोणी? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे तर काही कर्मचारी जेवणासाठी घरी गेले होते.सोयगाव तहसील कार्यालयात काही कर्मचाऱ्यांच्या खुर्ध्यावर इतर कोणीतरी तर काही खुर्चीवर चक्क  संगणक हाताळताना निदर्शनास आले. शासकीय कार्यालयात शासनाने जेवणाची निश्चित वेळ न पाळता सोयीनुसार जेवण आणि सोयीनुसार काम करतानाची स्थिती दिसून आले.

Related Articles

Back to top button