जरंडी येथे ब्राम्हण समाजाचे संमेलन संपन्न.
सोयगाव दि. १२ (बृत्तासेवा) जरंडी येथे गौतम गोत्री ब्राम्हण समाजाचे सोमवारी अधिवेशन झाले. सेवा निवृत्त पोलीस अधीक्षक शशिकांत राजहंस यांच्या पुढाकारातुन दरवर्षी या संमेलनाचे आयोजन होत असते गौतम गोत्री परिवार एकत्र करून त्यांच्या समस्या पुढील पिढीसाठी काय करता येईल हा उद्देश या अधिवेशनाचा आहे. त्यात हुतात्मा विश्वनाथ राजहंस यांचे नाव राज्य शासनाने सोयगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव या अधिवेशनात घेण्यात आला सरपंच स्वाती पाटील, ग्रामपंचायत सदस्य वंदना ताई पाटील यांच्या हस्ते अधिवेशनचे उद्घाटन करण्यात आलेदरम्यान त्या निमित्ताने सोयगाव च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सर्वांनी भेट देऊन प्राचार्य म्हस्के यांचेही अभिनंदन केले. या अधिवेशनात हुतात्मा राजहंस यांचे भाचे रवीकांत कुलकर्णी (अभियंता महानगर पालिका छ. संभाजीनगर) शशिकांत राजहंस (निवृत्त पोलीस अधीक्षक) श्री. राजहंस (माजी प्राचार्य सोयगाव आय. टी. आय. सोयगाव ) हे प्रमुख अतिथी होते, विपुल राजहंस यांनी आभार मानले.



