राजश्री शाहू महाराज निबंध स्पर्धेत धनश्री अमोल निकम चा प्रथम क्रमांक.

सोयगाव दि. ०१ (प्रतिनिधी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुकास्तरावर प्राथमिक व माध्यमिक विध्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज निबंध स्पर्धा २०२४ ही तीन गटात घेण्यात आली होती. यात धनश्री अमोल निकम या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावल्याने सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतः च्या जीवनाची उन्नती करावी. यासाठी सारथी या संस्थेने तीन गटात वेगवेगळे विषय देत निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. गट क्रमांक ०१ इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी, विषय अ)-राजश्री छत्रपती शाहू महाराजांची एक आठवण, ब)-राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जिवनातील मला आवडलेला एक प्रसंग. शब्द मर्यादा १०० शब्द. गट क्रमांक ०२ इयत्ता ६ वी ते इयत्ता ७ वी, विषय-अ) राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य. ब) राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य. शब्द मर्यादा – ३०० शब्द. गट क्रमांक ०३ इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी, विषय- अ) राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि वसतिगृह चळवळ. ब) राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषि क्षेत्रातील कार्य. शब्द मर्यादा – ५०० शब्द. अशा तीन गटात तालुकास्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री अमोल निकम (इयत्ता ६ वी), द्वितीय क्रमांक गौरी सचिन पाटील (इयत्ता ७ वी), तृतीय क्रमांक कोमल अमोल पाटील (इयत्ता ७ वी), चतुर्थ क्रमांक प्रतिक गजानन क्षीरसागर (इयत्ता ५ वी) या कै. बाबूरावजी काळे मराठी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. संस्थेचे प्रतिनिधी प्रा. कमलेश काळे, शाळेचे मार्गदर्शक प्रा. डॉ.दादासाहेब पवार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस, सागर घाटे, शिक्षिका मनीषा पाटील, अंजली बशलकर, शितल वराडे, शितल पगार, विद्या पाटील, नम्रता पाटील, रोहिणी पाटील, नलिनी पाटील, प्रेरणा मोरे, निकिता सोळुंके, शितल गावंडे, जयश्री श्रीवास्तव, आशा गणगे, शिक्षक योगेश काळे, संदीप निकम, शाहदत तडवी, हरिष कोळी, समाजसेवक दत्तू रोकडे, पत्रकार दिलीप शिंदे, संदीप इंगळे, शाम पाटील, तुकाराम सोनवणे, मुरलीधर बागले, अनिल चौधरी, राम सोहनी,महेश मानकर, दिलीप सुरडकर, दींनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



