व्हायरल रेकॉर्डिंगचा महायुतीच्या उमेदवारास निवडणुकीत मतदानाचा फटका, महाविकास आघाडीच्या उमेदवारास सोयगाव तालुक्यातून लीड–

सोयगाव दि. २४ (वृत्तसेवा) सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदार संघाचे महायुती चे उमेदवार असलेले अब्दुल सत्तार यांना बबलू हाजीच्या दहशतीचा मतदान रुपी फटका बसल्याने आमदार अब्दुल सत्तारांची सोयगाव तालुक्यावर असलेली पकड सैल झाली आहे. प्रभागातील नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मतदारांशी केलेल्या भेदभाव व बबलू हाजीच्या व्हायरल रेकॉर्डिंगचा आमदार सत्तारांना सोयगाव तालुक्यात मतदानाची किंमत मोजावी लागल्याची चर्चा ठिकठिकाणी सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सोयगाव तालुका शासकीय अधिकाऱ्यांवर आमदारा नातेवाईक असल्याने बबलू हाजीची दहशत आहे. सोयगाव नगरपंचायत मध्ये अब्दुल सत्तार यांची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्षा, नगरसेवक हे नावालाच आहेत. सर्वसामान्य नागरिकांना नगरपंचायत कडून लागणाऱ्या प्रमाणपत्र, घर बांधण्यासाठी लागणारी परवानगी व इतर शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्रे घ्यायची असल्यास स्थानिक नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी, अधिकारी बबलू हाजी यांना भेटा असे सांगतात. नगरपंचायत कार्यालयाशी बबलू हाजीचा काही संबंध येत नाही. नगराध्यक्षा व नगरसेवक नावालाच आहेत. बबलू हाजी केवळ आमदाराचा नातेवाईक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना नगरपंचायत चे उंबरठे सोडून आमदाराच्या संपर्क कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. स्वपक्षी असला तर काम लगेच केले जाते. विरोधी माणसासोबत बोलतांना दिसला किंवा शेठ विषयी विरोध दर्शक जरी बोलतांना आढळला तर त्याचे काम रखडवले जाते. यामुळे सर्वसामान्य जनता तर कंटाळली आहेच परंतु तहसीलदार, गटविकास अधिकारी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण, पाटबंधारे, पोलीस ठाणे, भूमिअभिलेख, महावितरण आदी कार्यालयाचे अधिकारी यांच्यावर सुद्धा बबलू हाजीची दहशत असून बबलू हाजीला विचारल्या शिवाय अधिकारी काहीच करीत नाही. सर्वसामान्य नागरिकांनी तालुका स्तरीय अधिकाऱ्यांसह, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या पाच वर्षात अनेक तक्रारी केल्या, वेळोवेळी आमरण उपोषण, जल समाधी या सारखे आंदोलन केली. परंतु अद्यापही वरिष्ठांकडून चौकशी करून कार्यवाह्या झाल्याच नाही. बबलू हाजीच्या समाजसेवक अंकुश पगारे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या रेकॉर्डिंगचा परिणाम हा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत झाला. सन २०१९ च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत सोयगाव तालुक्याने अब्दुल सत्तार यांच्यावर भरभरून प्रेम करीत नऊ हजार प्लसची लीड दिली होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्याविषयी आजही सर्वसामान्य नागरिकांमध्ये आदर आहे परंतु स्थानिक व गावखेड्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बबलू हाजीच्या कार्यप्रणालीमुळे नगरसेवक, पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांना नको तो त्रास सहन करावा लागत असल्याने आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात विजयी झाले मात्र यावेळी आ. अब्दुल सत्तार यांना सोयगाव तालुक्यातून मतदान रुपी फटका बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या निवडणुकीत सोयगाव तालुक्याने थोडी का होईना लीड दिली आहे. या निवडणुकी कडे आमदार अब्दुल सत्तार गांभीर्याने बघून कार्यकर्त्यांना समज देणार किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दलित वस्ती विकास, दलित स्मशानभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, दलित वस्तीत असलेल्या विहिरीचा विकास यासाठी समाजसेवक अंकुश पगारे यांनी अनेक वेळा उपोषण केली. उपोषण सोडविण्यासाठी बबलू हाजी, गटनेता अक्षय काळे, नगरसेविका पती कदिर शहा व इतर नगरसेवक उपस्थित होते. गेल्या चारपाच महिन्या पासून पगारे हे सातत्याने नगरसेवक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत आहे. नगरसेवकांकडून हाजी बबलू यांच्याशी बोलतो असे सांगून टाळले जात आहे. पगारे यांनी बबलू हाजी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे साधलेल्या संभाषणात नगरपंचायतशी काहीही संबंध नसलेला बबलू हाजी सांगत आहे. नगरपंचायत गरीब आहे, गावातून पाच टक्के सुद्धा वसूली नाही, त्यामुळे अडचण असल्याचे सांगितले. नगरपंचायतच्या कारभारात बबलू हाजी ढवळाढवळ करीत असल्याची रेकॉर्डिंग पगारे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. नगरसेवक, पदाधिकारी सुद्धा बबलू हाजी यांच्या वागणुकीमुळे त्रस्त झाले आहे. व्हायरल रेकॉर्डिंगचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीत सोयगाव शहरासह तालुक्यातुन आमदार अब्दुल सत्तार यांना मतदानाची किंमत मोजावी लागली आहे.



