बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान…
वनविभागातर्फे रक्तदाते व उपस्थितांना वृक्षांची रोपे वाटप...

सोयगाव दि. १२ (वृत्तसेवा) विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या तर्फे दि. १२ शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक दिनाजी खंदारे यांच्याहस्ते करण्यात आले व रक्तदानास सुरुवात झाली. यावेळी सोयगाव शहराचे प्रथम मा. नगराध्यक्ष कैलास काळे, समाजसेवक भूषण बारी (शेंदुर्णी), सुधिरनाना कुलकर्णी, योगेश मानकर, संतोष बोडखे, योगेश इंगळे, नाथाभाऊ इंगळे आदींची उपस्थिती होती.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव यांच्या सयुक्ताने ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी आठ वाजता रक्तदानास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान सुरु होते. ह्या शिबीरात जवळपास ५५ जणांनी रक्तदान केले. असुन रक्त सकंलण करण्याचे काम डॉ. मकरंद वैध, तंत्रज्ञ सौ. उज्वला पाटील, तंत्रज्ञ सौ.जागृती लोहार, तंत्रज्ञ जयेश पाटील, संपर्क अधिकारी निलेश पारगावकर, मदतनीस जयंत पाटील, उदय सोनवणे यांनी केले. यावेळी वनविभागाचे वनरक्षक वैजिनाथ नागरे, शरद चेके यांच्यासह गणेश गायकवाड, अमोल निकम, केतन शिंदे, गौरव पवार, राहुल पाटील, रितेश चौधरी आदींसह ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश नागरगोजे, वैजिनाथ नगारे यांनी रक्तदाते व उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते वृक्षांची रोपे देण्यात आली व त्यांचे लागवड करुन वृक्ष वाढ करण्यात यावे असे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश नागपुरे, भारत हिरे, राजेश राऊत, अनिल एन्डोले, योगेश राऊत, सुरेश घन, रविंद्र गिरी, सचिन चौधरी, वैभव बागले, निलेश वाघ, सतीश राजनकर, राजू माळी, दीपक सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.



