क्राईम

नगर पंचायतचा कारभार रजाकारीत त्यावर अधिकाऱ्यांची हुकुमशाही, वैतागलेल्या कर्मचाऱ्याची आत्महत्या.

सोयगाव येथील घटना.. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ठेवला नगर पंचायत च्या दारात..

निलंबन काळातील वेतन थांबविल्याने ओढवली परिस्थिती. मुख्याधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

सोयगांव दि. ०९ (वृत्तसेवा) पैशा अभावी १९ वर्षाच्या मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सोयगावात बापलेकीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. नगर पंचायत कर्मचारी असलेल्या बापाला निलंबीत काळातील वेतन न दिल्याने दोन जीव गेल्याचा आरोप करीत मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर कारवाई करून मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीला तात्काळ नौकरी दया या मागणीसाठी संतप्त नातेवाईक व नागरिकांनी मृतदेह तीन तास नगर पंचायत कार्यालयात ठेवून आक्रोश केला.

दिपक प्रल्हाद राऊत (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते नगर पंचायत चे कर्मचारी होते. त्यांची १९ वर्षीय मुलगी वैष्णवी हिचा दि. ७ रविवार रोजी जळगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. घरी आल्यावर रात्री घरातील सर्व झोपी जाताच दि. ०८ सोमवार रोजी रात्री दिड ते दोन च्या दरम्यान गळफास लावून दिपक ने आत्महत्या केली. या घटनेमुळे सोयगावात एकच खळबळ उडाली. ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिक्षक यांनी तपासून मृत घोषित केले त्यानंतर सकाळी शवविच्छेदन केल्यावर मृतदेह संतप्त झालेल्या नातेवाईक व नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयाच्या दारात आणून ठेवला होता.

दिपक राऊत याला फेब्रुवारी महिन्यात निलंबीत करण्यात आले होते. मुख्याधिकारी यांच्या मनमानी व हुकुमशाही धोरणामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यापासून त्याला पगार मिळाला नव्हता. निलंबन काळातील अर्धा पगार दया याविषयी दि. २६ मार्च रोजी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या कडे विनंती अर्ज केला होता. तरीही वेतन मिळाले नाही. मुलीच्या पोटात त्रास होऊ लागल्याने व पैशाची अडचण असल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. पोटाचा त्रास वाढल्यामुळे दि. २ एप्रिल रोजी रात्री मुलीला जळगाव येथील सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले. दि. ३ एप्रिल रोजी शस्रक्रिया झाल्यानंतर मुलगी कोमात गेली आणि दि. ०७ रविवार रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तिच्यावर सोयगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्याजवळ पैसे नव्हते म्हणून आपली मुलगी गेली या आपराधी भावनेतून रात्री सर्वजण झोपी गेल्यावर दिपक ने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सोयगाव परिसरात एकच खळबळ उडाली मुलगी आणि त्या पाठोपाठ वडील गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संतप्त नातेवाईक व नागरिकांनी दिपक चा मृतदेह नगर पंचायत च्या दारात आणून ठेवला. वेतन थांबवून आर्थिक अडचणीत आणणाऱ्या मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व दिपक च्या पत्नीला नौकरी उपलब्ध दया या मागणीसाठी आक्रोश करण्यात आला. दोन्ही मृत्यूस जबाबदार मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार करण्यात आली. तब्बल तीन तासानंतर तालुका प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार व्ही. टी. जाधव व पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी लेखी आश्वासन दिल्याने दुपारी तीन वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही घटनांची सोयगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या सदर प्रकरणात दडपशाही येते कि कारवाई होते हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.

मृत वडील दिपक राऊत व मुलगी वैष्णवी राऊत.

नगर पंचायत येथे सकाळी ११:३० ला दीपक राउत चे नातेवाईक नगरपंचायत कार्यालयात गेले च्या दरम्यान नागरिक मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी गेले असता नगर पंचायत ला कुलूप लावून कर्मचारी सुध्दा गायब झाले होते. गावातील नागरिक नगरपंचायत ला एकत्र आल्याने नगरपंचायत चे कुलूप खोलण्यात आले. सर्व कर्मचारी एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसले असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये रंगली होती.

Related Articles

Back to top button