क्राईम

“मुलगी शोधून द्या…” आईची पोलिसांकडे आर्त हाक.

हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश.

सोयगाव दि. ३ (वृत्तसेवा) तालुक्यातील आमखेडा येथील रहिवासी असलेल्या श्रीमती मायाबाई दणके यांची मुलगी करिना वय १६ वर्षे हि दि. १२ जानेवारी रोजी कपडे शिवून आणते असे आई वडिलांना सांगून घरातून निघाली ती अद्यापही घरी न आल्याने दि. १३ जानेवारी रोजी मुलीची आई श्रीमती मायाबाई दणके यांनी दिलेल्या तक्रारी वरून भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६३ नुसार सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुलीचा शोध लागत नसल्याने कुटुंब चिंतेत असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर मुलगी शोधून द्या अशी आर्त हाक पोलिसांकडे मुलीच्या आईने दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मी व माझे पती आनंदा दणके व एक मुलगा व चार मुलींसह आमखेडा येथे राहत असून मी व माझे पती घरी असताना माझी तीन नंबर ची मुलगी करिना आम्हाला म्हणाली की, मी जुने कपडे आपल्या गावातील टेलरकडून शिवून येते असे म्हणून ती घरातून टेलर योगिता वाघ (पूर्ण नाव माहीत नाही) यांचेकडे जुने कपडे शिवण्यासाठी गेली बराच वेळ झाला मुलगी करिना घरी न आल्यामुळे मी व माझे पती आमच्या गावातील टेलरकडे मुलीबाबत विचार पूस करण्यास गेली असता त्यांनी कळविले की करिना माझ्याकडे कपडे टाकून गेली मी थोड्या वेळाने येते असे म्हणून निघून गेली. त्यामुळे मी व माझे पतीने मुलगी करिना हिचा गावात आमखेडा, सोयगाव, अंभाई, कंकराळा, जरंडी येथे शोध घेतला ती मिळून आली नाही. दरम्यान मुलीचे संपूर्ण नाव करिना आनंदा दणके वय १६ वर्षे, अंगात पिवळ्यारंगाचा टॉप, हिरवट रंगाचा पायजमा, ओढणी पिवळ्या रंगाची, रंग सावळा, उंची साडे पाच फूट, केस लांब, नाक सरळ, शिक्षण चौथी थी भाषा मराठी डाव्या हातावर करिना नाव गोंदलेले, पायात सँडल व पांढऱ्या धातूची चैन असून दि. १२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार मुलीची आई मायाबाई दणके यांनी दि. १३ जानेवारी ला सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र ऐंशी दिवसांचा कालावधी लोटला असून अद्यापही अल्पवयीन मुलीचा शोध लागत नसल्याने पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यास पोलिसांना कधी यश येणार असा प्रश्न देखील दणके कुटुंबांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button