आपला जिल्हामहाराष्ट्र

टी. व्ही. व मोबाईल मुळे तरुण वर्ग व्यसनाच्या व वासनेच्या आहारी… बालकीर्तनकार अयोध्याताई सुलताने.

सोयगाव दि. ०३ (वृत्तसेवा) आमखेडा येथे आयोजित संगितमय श्रीराम कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्यात मराठवाड्यातील नामवंत बालकिर्तनकार अयोध्याताई सुलताने यांनी तरुण वर्गाला दिला अनमोल संदेश. तरुण वर्ग व्यसनाच्या व वासनेचा आहारी जात आहे. त्यामुळे तरुण वर्गाने संस्कारी जिवन जगावे असे व्यसनाच्या व वासनेचा आहारी जाऊ नये.
आमखेडा छ. शिवाजीनगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर च्या अठराव्या वर्धापनदिनाचा निम्मीताने आयोजित अखंड हरीनाम सप्ताह निम्मीताने आयोजित आज दि. ०२ मंगळवार रोजी तिसऱ्या दिवशी मराठवाड्यातील नामवंत किर्तनकार ह.भ.प. अयोध्याताई सुलताने यांनी “पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाय राम सर्वभावें। धन्य ते भाग्याचा तरला संसार, परमार्थाचें घर नाम मुखीं। करितसे कथा कीर्तनीं आवडी, ब्रह्माज्ञान जोडी तया लाभे। एका जनार्दनीं धन्य तें शरीर, परमार्थ संसार एकरुप।“ या अभंगावर हजारो भाविकांच्या उपस्थित चिंतनीय कीर्तन करून नव तरुणांना जीवनाचा अनमोल संदेश दिला. आई वडिलांनी विद्यार्थी व तरुण – तरुणींना मोबाईल न देता संस्कार द्यावे, मोबाईल मध्ये पन्नास ‌‍अॅप असेल तर त्यापैकी पंचेचाळीस अॅप हे विकाराचे कारण आहे तर पाचच अॅप योग्य माहिती देणारे असतात. तर टी. व्ही. वर दोनशे पन्नास चैनल पैकी दोनशे चाळीस चैनल हे अधोगतीकडे नेतात तर धार्मिक इतर माहिती देणारे पाच – दहाच चैनल असतात त्यामुळे टी. व्ही. व मोबाईल न देता संस्कार द्या असा संदेश देत मुलीनी व तिच्या पालकांनी देखील मुला कडील संपती पेक्षा त्यांच्या कडे असलेल्या संस्कारी मुलाला पसंती द्यावी. तसेच तरुण – तरुणांनी आई वडिलांचा सन्मान करावे असे आवाहन देखील केले. तसेच माणसाने माणूस म्हणून जगावे संसार तर पशु व प्राणी देखील करतात, दारू व इतर व्यसनाच्या आहारी न जाता मिळालेले शरीर हे परमार्थ कामात लावा व निरव्यसनी जगा. आपल्या आई वडिलांची सेवा करा.
यावेळी बालकीर्तनकार अयोद्याताई सुलताने यांचे सोयगाव परिसरातील हजोरो भाविकांनी कौतुक केले. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान तर्फे शरद महाराज पवार यांनी आभार मानले. तसेच बालकीर्तनकार अयोद्याताई सुलताने यांचे वडील सदाशिव सुलताने यांचे देखील संस्थान तर्फे आभार मानले.

Related Articles

Back to top button