आपला जिल्हा

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आयोजित सोयगाव येथे महारक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.

महारक्तदान शिबिरात दहा महिलांसह २५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज, महाराष्ट्र तर्फे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या माध्यमातून रक्ताची गरज लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, रक्ता अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये, या अनुषंगाने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे सोयगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण २५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व-स्वरुप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. त्या अनुषंगाने सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रेड प्लस पतपेढी जळगाव (खान्देश) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ बुधवार रोजी महारक्तदान शिबीर घेण्यात आले. दरम्यान यावेळी जगद् गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामीविवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड राजेश गिरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान संकलनास सुरुवात करण्यात आली. जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थान व रेड प्लस पतपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे महारक्तदान शिबीर घेण्यात आले असुन सकाळी आठ वाजता रक्तदानास सुरुवात झाली. सकाळपासून रक्तदान करणारांची ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रात्री आठ वाजेपर्यंत रक्तदान सुरु होते ह्या शिबीरात जवळपास २५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात दहा महिलांनी देखील रक्तदान करून “रक्त दान हेच श्रेष्ठ दान” असल्याचे सांगतिले. रक्त सकंलण करण्याचे काम डॉ. अमोल शेलार, निलेश घोंगडे, रविंद्र पाटील, विरेंद्र बिऱ्हारे, पकंज पाटील, राहुल पाटील, सागर पाटील, वरुण तेली, संदीप चव्हाण हरेश्वर पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष संतोष झोंड, गणेश कापरे, गणेश गायकवाड, संजय भोसले, हरिष पाटील, अनिल चौधरी, राजू पाटील, दिपक सातपुते, दिपक काळे, योगेश राऊत, विष्णू पंडित आदींसह महिला सेवेकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button