महाराष्ट्रराजकीय

पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सभेत उपस्थितांमध्ये उलट-सुलट चर्चा.

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) मागील एक वर्षात त्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. २६ एप्रिल २०२३ रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चे भूमिपूजन केले होते त्या प्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांच्या सह अनेक मान्यवर यांची देखील उपस्थिती होती. पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम साठी ०७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता घेत ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दि. ११ आगस्ट २०२३ रोजी भूमिपूजन करण्यात आले. तसेच सोयगाव येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयमध्ये श्रेणीवर्धित झाल्याने रुग्णालयाच्या मुख्य इमारत साठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. त्यापैकी तिन्हीही कामे निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे तक्रार सर्व पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी लेखी निवेदन प्रशासनाला दिले होते. त्यामुळे तालुक्यातील  फर्दापूर येथील ०९ कोटी २७ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ना. अब्दुल सत्तार यांनी अनेक आश्वासने देत फर्दापूर गावाला पाणी पुरवठा योजना मिळवून दिली याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या (सत्तारांचे कार्यकर्ते) वतीने ना. अब्दुल सत्तार यांनी भव्य सत्कार करवून घेतला.आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्ये सिल्लोड – सोयगाव मतदार संघात विशेषतः सोयगाव तालुक्यात ना. सत्तारांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कामे ही निकृष्ठ दर्जाची होत आहे. त्यामुळे ना. अब्दुल सत्तार यांनी ०९ कोटी २७ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण केले परंतु या योजनेचा फर्दापूर वासियांना किती दिवस लाभ होईल कि फर्दापूर वासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असा प्रश्न देखील उपस्थित नागरिकांमध्ये चर्चिला जात होता.

Related Articles

Back to top button