डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांची ‘करीअर कट्टा’ जिल्हा समन्वयक पदी निवड.

सोयगाव दि. १० (वृत्तसेवा) संत ज्ञानेश्वर महाविद्यालय चे डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांची महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आले.
अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांची महाराष्ट्र शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून ‘करिअर कट्टा’ या उपक्रमात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा समन्वयक पदी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी नियुक्ती पत्राद्वारे निवड केली. या निवडीबद्दल संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, तसेच अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ नाना काळे व सचिव प्रकाश दादा काळे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देत गुणगौरव केला….



