आपला जिल्हामहाराष्ट्र

जि. प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजगुरुच्या तोंडी एकच नाव, बबलू शेठचे काम, रस्त्याचे काम बोगस…

कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यक्रत्यांची निकृष्ठ कामांची साखळी.

सोयगाव दि. १३ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील चौकीतांडा गावापासून स्मशानभूमी पर्यंत २५/१५ आमदार निधीतून लाखो रुपये खर्च करून होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम बोगस प्रकारचे केले जात आहे. इस्टिमेट व कामा संदर्भात  जिल्हा परिषद शाखा अभियंता राजेश राजगुरू यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत विचारणा केली असता सदरील काम हे बबलू शेठ चे आहे असे सांगितले. कोणत्याही कामाची विचारणा करणासाठी शाखा अभियंता राजेश राजगुरू यांना विचारले असता काम बबलू शेठ चे आहे. असे सांगत असतात यामुळे बबलू शेठ च्या नावाखाली शाखा अभियंता राजेश राजगुरू याच्या आशीर्वादाने सिमेंट रस्त्याचे काम बोगस प्रकारे सुरू आहे. तर कोण आहे हा बबलू शेठ याची इतकी दहशत बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर असल्याने  सिमेंट रस्त्याचे होत असलेल्या बोगस कामाचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता राजेश राजगुरू यांनी समर्थन केले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश राजगुरू हे बबलू शेठ नावाचा वापर कशासाठी करीत आहे हे मात्र सोयगाव तालुका वासीयांना पडलेले एक कोडे आहे. सिमेंट रस्ता किती वर्षे टिकेल हा  मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोण बबलू शेठ याची मात्र चर्चा सद्या तालुक्यात रंगली आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील चौकीतांडा व न्हावितांडा या दोन्ही गावाची गावाबाहेर एक स्मशानभूमी आहे.चौकीतांडा गावापासून स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी  सिमेंट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २५/१५ आमदार निधीतून सदरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे माहिती फलक लावलेले नाही. सिमेंट रस्त्याचे काम करतांना रस्त्यात कमीजास्त खड्डे किंवा ओबडधोबड असलेला रस्ता जेसीबीच्या ब्लेडच्या सहाय्याने समान करून घ्यावा लागतो. सिमेंट रस्त्याचे काम करतांना रस्त्यात कमीजास्त खड्डे किंवा ओबड धोबड असलेला रस्ता जेसीबीच्या ब्लेडच्या सहाय्याने समान करून घ्यावा लागतो. रस्त्यावर सोलिंग टाकावे लागते. सोलिंग वर पतले ग्रॅव्हल टाकून  पाणी मारणे आवश्यक आहे. त्यानंतर रस्त्यावर वन टू फोरचे मिश्रण योग्य प्रमाणत टाकावे लागते. त्यात (डस्ट) फफुटयाचा वापर करता येत नाही. मात्र याला तिलांजली देत राजकीय दबाव व जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता राजेश राजगुरू यांच्या आशीर्वादाने चौकी तांडा ते स्मशानभूमी पर्यंत होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम बोगस प्रकारे चालू आहे. सिमेंट रस्त्याची लेव्हल करण्यात आलेली नाही. सोलिंग न टाकता मोठमोठे दगडे टाकण्यात आली आहे. दगडा पासून बनवलेला बारीक कच चा वापर करावा लागतो. काम करीत असताना दगडा पासून बनवलेली (रेती) कच मधील फफुटयास बांधकाम विभागाची बांधकामामध्ये वापर करण्यास मान्यता नाही.
दगडाच्या कचला गाळून फफुटा बाजूला करून उर्वरित कच चा वापर  करावा लागतो. मात्र कामांमध्ये मातीमिश्रित गावठी नाल्यातील वाळूचा सर्रास वापर केला जात आहे. सिमेंटचे कमी प्रमाण व फफुटयाचा जास्त प्रमाणात वापर केला जात असल्याने सिमेंट रस्त्याला फिनिशिंग येते परंतु फफुटयाच्या जास्त वापरामुळे रस्त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश राजगुरू हे आठवड्यातुन एक दोन वेळेस तालुक्यात फिरकतात  मात्र त्यांची येण्याची माहिती  सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. सिमेंट रस्त्याची चौकशी न करता ठेकेदाराचे कामाचे लाखो रुपयांचे देयक अदा करतात की बबलू शेठ चे नाव सांगून पोळी भाजून घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिमेंट रस्त्याच्या चौकशी संदर्भात तक्रार अर्ज करूनही चौकशी सुद्धा केली जात नाही  कारवाई होत नाही शाखा अभियंता राजेश राजगुरू यांच्या तोंडी असलेले बबलू शेठचे हे नाव मात्र एक कोडे बनले आहे.

Related Articles

Back to top button