अल्पवयीन पीडितेच्या अपहरण प्रकरणात पोक्सोचा गुन्हा दाखल; आरोपीस इंद्रगढी येथून अटक.

सोयगाव दि. २० (प्रतिनिधी संदीप इंगळे) अल्पवयीन पीडिताचे अपहरण करून दि. १३ डिसें. बुधवार रोजी पासून फरारी असलेल्या आरोपीस मंगळवारी दि. १९ मंगळवार रोजी पहाटे तीन वाजता, सोयगाव पोलिसांनी इंद्रगढीच्या जंगलातून सापळा रचून अटक केली याप्रकरणी त्यांचेवर वाढीव कलमा अंतर्गत पोक्सोचा गुन्हा सोयगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
बोरमाळ तांडा येथील अल्पवयीन पीडितेस फुस लावून अपहरण केल्याची घटना दि. १३ बुधवार रोजी घडली होती. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनि अनमोल केदार, उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी अपहरण प्रकरणी वेगात तपास सुरू केला असता दि. १९ मंगळवार रोजी पहाटे तीन वाजता उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी इंद्रगढीच्या जंगलात थंडीत सापळा रचून गुन्ह्यातील अल्पवयीन पीडिता व आरोपी रवींद्र सर्जेराव सोनवणे (वय १९ वर्ष) रा. बोरमाळ तांडा ता. सोयगाव यास घटनास्थळ वरून ताब्यात घेवून सोयगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री नऊ वाजता अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश झलवार, उपनिरीक्षक रजाक हुसेन जमादार राजू बर्डे, विकास दुबिले, श्रीकांत तळेगावे, संदीप सुसर, रवींद्र तायडे, अजय कोळी, यांच्या पथकाने केली व पुढील तपास पिंक पथकाचे उपनिरीक्षक कौळासे सिल्लोड यांचेकडे दिला आहे. याप्रकरणी आरोपी रवींद्र सोनवणे यांच्या विरुद्ध ३७६ (२) भादवी सहकलम ४,८,१२ पोस्को वाढीव कलम अंतर्गत गुन्ह दाखल करण्यात आला आहे.



