क्राईममहाराष्ट्र

मंत्र्यांच्या मतदारसंघातील सावळदबारा येथे मुलीच्या घरात घुसून बहीण व आईवर हल्ला, सोयगाव तालुक्यात खळबळ.

सोयगाव दि. १५ (वृत्तसेवा) मंत्र्यांच्या मतदारसंघातील सावळदबारा ता. सोयगाव येथे मजुरी करण्याऱ्या मुलीची छेड काढीत आई व बहिणीला मारहाण करीत संघाचे कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला केल्याची घटना दि. ११ सोमवार रोजी दुपारी सावळदबारा येथे घडली असून यात दोन मुली व पत्नी, पती जखमी झाले असून त्यांच्यावर सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून सोयगाव – सिल्लोड ची ओळख आहे. त्यातच सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे राहणाऱ्या संघ कार्यकर्त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या मुस्लिम तरुणाने एक तरफी प्रेमातून त्यांच्या घरात घुसून आठरावर्षीय युवतीचा हात पकडुन तू माझ्या सोबत पळून चल आपण दोघे लग्न करू तू जर नकार दिला तर तुला मारून टाकेल असे धमकावत मुलीला जबरदस्ती जवळ ओढले. मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्या मुस्लिम तरुणाने मुलीला बेदम मारहाण केली. तिचा आरडा ओरडा ऐकून तिची आई घरात गेल्यावर सदरील तरुणास तू माझ्या मुलीला का मारतो असे विचारताच तरुणाने मुलीच्या आई व बहिणीला सुद्धा मारहाण केली. त्याच वेळी तरुणाच्या कटुंबाने घरात घुसून तिघांना मारहाण केली. घडलेल्या प्रकरणाची सरपंचाना माहिती देण्यासाठी जात असलेल्या तरुणीच्या वडिलांवर सुद्धा मुस्लिम तरुणाने हल्ला केला यात त्यांचा हात मोडला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तरुणीने दि. १२ मंगळवारी फर्दापूर पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अल्ताफ हमीद शेख, हमीद अहमद शेख, महबा अहमद शेख, रिजवाना महेबूब शेख रा. सावळदबारा ता. सोयगाव यांच्यावर भादवी ३५४(अ), ३२५, ३२४, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button