महाराष्ट्र

सोयगावात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम, आजपासून सुरुवात.

सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा) शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात सोमवारी (दि. १७) ते गुरुवारी (दि. २०) चार दिवसीय गजानन महाराज प्रगट दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या चार दिवसाच्या दरम्यान विविध भक्ती मय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी सोमवारी ह. भ. प. रवींद्र महाराज परेराव हे संगीत मय भावकथा सांगणार आहे मंगळवारी सकाळी महाराजांचे मंगल स्नान, अभिषेक व आरती व रात्री भावकथा वाचन होणार आहे. बुधवार सकाळी आठ वाजता श्री. ची पालखी शोभा यात्रा काढण्यात येऊन संत व छत्रपती शिवराय यावर ह. भ. प. अरविंद कुलकर्णी हे प्रवचन करतील, रात्री आठ वाजता भावकथा चरित्र तर गुरुवारी महाराजांना मंगल स्नान, मंत्रोक्त अभिषेक, दुपारी बारा वाजता श्रीं ची महा आरती व दुपारी बारा वाजता महाप्रसाद श्री गजानन बावननी पठण व नामजप असे विविध कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Back to top button