महिला बचत गटांना एक कोटी, ३३ लाख, ८० हजार निधी खात्यात जमा :- १७ ग्रामसंघाच्या २९५ बचत गटांना लाभ.
सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी व व्यवसायाकडे वळविण्यासाठी एक कोटी, ३३ लाख, ८० हजार रु. समुदाय गुंतवणूक निधीची रक्कम मंगळवारी २९५ महिला बचत गटांच्या खात्यात वर्ग झाल्याची माहिती अभियान व्यवस्थापक तुषार बरगट यांनी दिली दरम्यान आमखेडा प्रभाग संघातील १७ ग्रामसंघांना पहिल्या टप्प्यात हा निधी वर्ग करण्यात आला आहे
तालुक्यातील जरंडी येथे मंगळवारी दुपारी एक वाजता अभियान व्यवस्थापक तुषार बरगट यांच्या अध्यक्षतेखाली आमखेडा प्रभाग संघाची बैठक घेण्यात आली दरम्यान महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण साठी हा निधी देण्यात आला असून महिलांनी यातून व्यवसाय उभारावे महिलांना व्यवसायाकडे वळविण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला असल्याचे तुषार बरगट यांनी सांगितले या निधीतून बचत गटांच्या महिलांनी मोठे व्यवसाय उभारावे पहिल्या टप्प्यात आमखेडा प्रभाग संघाला हा निधी वितरित करण्यात आला आहे या प्रभाग संघात १७ ग्रामसंघ व २९५ महिला बचत गट आहेत प्रत्येक बचत गटाला ६० हजार रु. प्रमाणे निधी मिळणार आहे. यामधून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योग उभारावे असे आवाहन पंचायत समितीचे तुषार बरगट यांनी केले बैठकीत प्रभाग संघाच्या अध्यक्ष वर्षा चौधरी, रत्ना ढाकरे, मीराबाई सोनवणे, वंदना ताई पाटील, संध्या पाटील, वैशाली गवळे, आदींसह १७ ग्रामसंघाच्या अध्यक्ष, सचिव, पंचायत समितीच्या बचत गट विभागाचे सत्यजित राठोड, प्रेमनाथ राठोड, सखुबाई पवार, समुदाय संसाधन व्यक्ती, उपजीविका सखी आदी उपस्थित होत्या.



