आपला जिल्हा

गोठ्याला आग, मका व जनावरांच्या चाऱ्यासह गोठा जळून खाक; रामपुरा शिवारातील घटना.

सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा) तालुक्यातील निंबायती (रामपुरा) शिवारातील शेतातील गोठ्यात अज्ञातांनी मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास आग लावल्या ची घटना रात्री एक वाजता उघडकीस आली दरम्यान या आगीचा घटनेत शेतातील कापणी करून ठेवलेल्या मक्याची गंजी, जनावरांचा चारा, गोठ्याची पंचवीस पत्रे, ठिबक ची बंडल आदी वस्तू जळून खाक झाल्या असून अंदाजे तीन लाख रुपये चे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अद्यापही महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला नाही. इंदुबाई रतन राठोड यांच्या शेतातील गोठा ला अज्ञातांनी आग लावून (निंबायती) रामपुरा शिवार मधील गट नंबर ४५ शेतामधील मकाचा गंज जनावराचा चारा वीस ते पंचवीस पत्रे व ठिबक बंडल जळून खाक झाले.

अंदाजे ३ लाख रुपये पर्यंत नुकसान झालेले आहे. दरम्यान घटनेची आगीची माहिती मिळताच गावातून वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीची आक्रमकता अधिक असल्याने आग नियंत्रणात न येता, आगीने शेतात प्रवेश करून शेतातील जनावरांना चारा, जळून खाक झाला आहे दरम्यान गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे परंतु दैव बलवत्तर होते म्हणून गोठयात असलेली जनावरे एक म्हैस, व दोन बैल बाहेर बांधलेली होती. त्यामुळे ही जनावरे वाचली आहे याप्रकरणी शेतकरी इंदूबाई राठोड यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून सोयगाव पोलिसांनी घटनेची नोंद करण्यात आली. तसेच महसुल विभागाला माहीती देवुन देखील महसुल विभागाने घटना स्थळी भेट दिली नाही. त्यामुळे महसुल विभाग नाराजी व्यक्त करीत तहसील कार्यालयात नुकसान भरपाई साठी निवेदन देण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button