तहसिल कार्यालयात राष्ट्रसंत संत श्री. गाडगेबाबा महाराज यांची शिपाई व कोतवाल ने केली जयंती साजरी, अधिकारी कर्मचाऱ्यांची दांडी.

सोयगांव दि. २३ (वृत्तसेवा) तहसिल कार्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीला निवासी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्भक्त, महापुरुष यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात शासनाने आदेशीत केले आहे. सुटीच्या दिवशी येणारी जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासाठी शासकीय कार्यालयात अधिकारी हजर राहत नसल्याचा सोयगाव तालुक्याचा इतिहास झाला आहे. या प्रकाराकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने जयंती, पुण्यतिथी साजरी करणेस अधिकारी येत नसल्याने शिपाई व एखादी कर्मचारी फक्त देखावा म्हणून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती, पुण्यतिथी साजरी केल्याचे फोटो वरिष्ठांना पाठवत आहे. यामुळे नागरिकांमधून अधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती तहसिल कार्यालयात साजरी करतांना तहसिल कार्यालयाचे शिपाई संतोष नवगिरे व कोतवाल मनोज आगे हे दोघे उपस्थित होते. राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस शिपाई संतोष नवगिरे यांच्याहस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले यावेळी कोतवाल मनोज आगे उपस्थित होते तर चार नायब तहसीलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाई होत नसल्याने तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे.याबाबत काय कारवाई केली जाते हा सद्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.



