आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ महिलांच्या कुटुंब कल्याण शस्रक्रिया.
सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) जरंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी एकाच दिवसात १६ महिलांच्या कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यात आल्या आहे तालुक्यातील एकमेव जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्रक्रिया शिबिर सुरू आहे दर आठवड्यात या ठिकाणी कुटुंब कल्याण शस्रक्रिया शिबिरे होत आहे. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी सांगितले
सोयगाव सह १४ गावातील १६ महिलांवर गुरुवारी दुपारी दोन वाजता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी कुटुंब कल्याण शस्रक्रिया केल्या दरम्यान यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल वारंगणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा डुकरे, हिरामण दुधे, अविनाश जागरूक, विकास लहाने आरोग्य सहयिका संगीता सिरसाट, आरोग्य सेवक श्रीराम चव्हाण, राहुल दांडगे आदीसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.



