श्रीमती मिनाक्षी बिराजदार यांचा सोयगाव तालुक्याच्या वतीने महिला मेळाव्यात जाहीर सत्कार.
सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) स्वर्गीय दयानंद बिराजदार यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्ताने महिला मेळावा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२२- २३ महाराष्ट्र शासनाच्या वतीने संभाजीनगर विभागातून मीनाक्षी बिराजदार यांना देण्यात आल्याबद्दल त्यांचा सोयगाव तालुक्याच्या वतीने दि. २० गुरुवारी कोविड सेंटरमध्ये महिला मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर यांच्याहस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पुष्पा काळे तर प्रमुख पाहुणे इद्रिस मुलतानी कार्यक्रमाचे आयोजक एकात्मिक कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे सचिव राजकुमार बिराजदार या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक संतोष पाटील रा. आंबेवडगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी मृदू व जलसंधारण उपविभागीय अधिकारी सूर्यकांत निकम, महेश निकम यांचे मार्गदर्शन केले तर सोयगाव पोलीस ठाण्याचे फौजदार आरेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. दरम्यान मिनाक्षी बिराजदार यांनी गेले पंचवीस वर्षे विविध क्षेत्रात महिला सक्षमीकरण दलित आदिवासी वंचित घटकातील लोकांसाठी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई महाराष्ट्र शासन यांच्यावतीने गौरविण्यात आले. सोयगाव तालुक्याच्या वतीने सौ. पुष्पाताई काळे व उपस्थित महिलांच्या हस्ते सत्कारमूर्ती मिनाक्षी बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वर्गीय दयानंद बिराजदार यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव राजकुमार बिराजदार यांनी तर सूत्रसंचालन संभाजी नागणे, प्रशांत खोडपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश बिराजदार, अनिल ठोंबरे, संगीता गायकवाड व प्रीती बिराजदार यांनी परिश्रम घेतले.



