आपला जिल्हा

पहिल्यांदा झाले पदाधिकारी हस्ते सोयगाव बाजार समिती येथे ध्वजारोहण.

सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा)  बाजार समिती सोयगाव ही १९७४ ची स्थापना झालेली बाजार असून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून बाजार समिती स्थापना करण्यात आली होती, परंतु तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र व दळणवळणाची साधने अत्यल्प असल्या कारणाने मोठ्या बाजारपेठेत रूपांतर होऊ शकलेले नाही, समिती स्थापने पासून ड वर्गात असल्या कारणाने येथे सेवा – सुविधा, शेतकरी व व्यापाऱ्यांना पन्नास वर्षात देऊ शकले नाही.

  बाजार समिती सोयगाव कार्यक्षेत्रामध्ये मोठा व्यापार नसल्यामुळे शेजारील तालुक्यातील व्यापारावरच येथील कार्यक्षेत्राची उलाढाल अवलंबून आहे, बाजार समिती सोयगावच्या पन्नास वर्षाच्या काळात दोन – तीन वेळा संचालक मंडळ वगळता अनेक वर्ष बाजार समितीवर प्रशासक राज होते, बाजार समिती जवळ स्वतःचे कार्यालयाची जागा नसल्याने कोणत्याही प्रकारचे ध्वजारोहण होत नव्हते.

    गेल्या दोन वर्षापूर्वी शेतकरी हिताचा व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री नामदार सत्तार यांनी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार करून सदरची बाजार समिती ही सिल्लोड बाजार समितीत विलीन केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सोयगाव हा उपबाजार घोषित करण्यात आला आहे, सध्या बाजार समिती सिल्लोड येथे नवनिर्वाचित संचालक मंडळ अस्तित्वात आल्याने उपसभापती म्हणून दारासिंह बंडू चव्हाण हे उपसभापती म्हणून सोयगाव तालुक्यातून विराजमान झाले आहे. यामुळे त्यांच्या हस्ते दि. १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत सोयगाव बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच अमृत महोत्सवी ध्वजवंदन करण्यात आले. विशेष म्हणजे बाजार समिती सिल्लोड चे उपसभापती दारासिंह बंडू चव्हाण यांच्यासह त्यांचे चिरंजीव व नातूसह सलग तीन दिवस उपबाजार सोयगाव येथे सकाळीच हजर होऊन ध्वज फडकवण्याचा व वंदन करण्याचा प्रथम मानमिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी बाजार समिती कर्मचाऱ्यांसह गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button