सोयगाव न. प. च्या हुकुमशाही कारभारा विरोधात स्वतंत्र दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा.

सोयगाव दि. ०१ (वृत्तसेवा) शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात अतिशय घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून त्यातच नगर पंचायत हुकुमशाही करीत अतिक्रमण न काढता, कामाच्या ठिकाणी कोणतेही फलक न लावता सदरील काम निकृष्ठ पद्धतीने गटार नालीचे काम करीत असून तात्काळ त्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश पगारे हे दि. १५ आगस्ट (स्वतंत्र्य दिनी) विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दि. ३१/०७/२०२४ रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सोयगाव जुना बाजार चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारील मुख्य गटारीवरील अतिक्रमण काढून तात्काळ गटार नव्याने बांधण्यात यावी. तसेच सदरील काम हे कोणत्या वर्षी मंजूर झाले आहे. कामाचे इंजिनीअर, ठेकेदार कोण आहे, तसेच कामाचे अंदाजपत्रक (इस्टीमेंट) देण्यात यावे व कामाच्या ठिकाणी सविस्तर फलक लावण्यात यावा, सदरील काम हे अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दि. ३१ बुधवार रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जिल्हा धिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, तहसील कार्यालय सोयगाव, नगरपंचायत कार्यालय सोयगाव यांना लेखी निवेदन देण्यात आले असल्याचे उपोषणकर्ते अंकुश पगारे यांनी सांगितले. तसेच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पगारे म्हणाले कि, आम्हाला लोकशाहीच पाहिजे नगरपंचायत कार्यालयात मोठ्या राजकीय नेत्यामुळे हुकुमशाही चालू आहे. त्यामुळे सोयगाव शहरातील विकास कामे हे मनमानी पद्धतीने चालू असून परिसरात दुर्घंधी पसरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील गटार हि नादुरुस्त असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पावसाच्या पाण्याचा तलाव निर्माण होतो. त्यात वाहून आलेले प्लास्टिक, जोडे, चपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आत मध्ये जाऊन अटकतात त्यामुळे पुतळ्याची विटंबना होत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तरी तात्काळ वरील मागण्या मंजूर कराव्या नसता दि. १५ आगस्ट (स्वतंत्र्य दिनी) विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे विविध पक्ष, संघटना यांच्या सह आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.



