क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थे मार्फत सर्वसामान्य जनतेसाठी पाणपोईचे उदघाटन.

सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून सोयगाव येथे क्रांती जनहित बहुउद्देशिय विकास संस्था आमखेडा व माऊली संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव – जरंडी राज्य महामार्गालगत संस्थेच्या कार्यालयासमोर दि. १४ शनिवारी लोक कलावंत विष्णू मापारी व समाजसेवक गणेश कापरे यांच्या हस्ते पाणपोई चे उदघाटन करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक हे शासकीय कामासाठी सोयगाव येथील कार्यालयात येत असतात. बहुतांश शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेमुळे घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागातून कामानिमित्त सोयगाव येथे येत असलेल्या नागरिक, महिला, वयोवृद्ध यांना थंड व स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून सोयगाव – चाळीसगाव राज्यमहामार्ग लगत संस्थेच्या कार्यालयासमोर मोफत पाणपोई सुरु करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, संचालक अनिल लोखंडे, अशोक ढगे, ज्ञानेश्वर गाडेकर, यांच्या सह गजानन ढगे, विष्णू साळवे, ईश्वर बडक, विश्वनाथ कोथलकर, विलास मिसाळ, ज्ञानेश्वर इंगळे, भागवत दणके, विनोद चौधरी आदी उपस्थित होते.



