आपला जिल्हा

बालगोपालानी धुलीवंदन केले मोठ्या उत्साहात साजरे…

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात धुलिवंदन साजरा करण्यात आला. शहरात सकाळपासूनच चिमुकल्यांसह, तरुण व जेष्ठांनी रंगीबेरंगी रंगाची उधळण करीत धुलीवंदनास सुरवात करण्यात आली होती.
सोमवारी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळ पासूनच शहरात रंगोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली होती. चिमुकल्यांसह, तरुण व जेष्ठांनी सकाळपासून एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान तरुणांसह चिमुकल्यानी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंगीबेरंगी रंगाने रंगवीत व पारंपरिक पद्धतीने पळसाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या रंगाने एकमेकांना ओले करीत धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी शहरात रस्त्याने रंगाचा सडा पडल्याने शहर मनमोहक दिसत होते.

Related Articles

Back to top button