
सोयगाव दि. २८ (वृत्तसेवा) तालुक्यातील जरंडी येथील रहिवासी विठ्ठल नामदेव पाटील (तिडके) यांचे (दि. २८) बुधवारी रात्री एक वाजता निधन झाले त्यांचेवर सकाळी अकरा वाजता जरंडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. कैलास विठ्ठल पाटील यांचे ते वडील तर उपसरपंच संजय पाटील यांचे ते काका होते.



