छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात १५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सोयगाव दि.०५ (वृत्तसेवा) सोयगाव तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य महसूल सप्ताह निमित्त सुरू असलेल्या महसूल सप्ताह निमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमानुसार सोयगाव तहसील कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि.०५ मंगळवारी कोविड सेंटर सोयगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी नायब तहसीलदार संभाजी देशमुख, काकासाहेब साळवे यांची उपस्थिती होती.
सकाळी नऊ वाजता रक्तदानास सुरुवात झाली. मंडळ अधिकारी अरुण पंडित, लक्ष्मण जाधव, ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड, शंकर देवतुळे, आकाश पिराने, तुषार नागपुरे, अंकुश चव्हाण, शिवाजी शेरे आदींसह १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. रक्त सकंलण करण्याचे काम दत्ताजी भाले रक्तकेंद्र छत्रपती संभाजीनगर, रक्तकेंद्राचे जनसंपर्क अधिकारी निवृत्ती मोरे, अजिनाथ बडक, वामन कांबळे, प्रवीण तायडे, वैभव डाके, आकाश बोर्डे व केशव गिऱ्हे यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी महसूल च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



